कवितेवर बोलू काही....
माझा हा पहिलाच ब्लॉग कवितेवर आहे. सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो, की कसं काय जमतं या कवी मंडळींना कविता करायला? कसं सुचतं इतकं लिहायला? वगैरे वगैरे.....
मित्रांनो कविता शिकणे सुध्दा ही एक कला आहे. आणि मन हा तिचा गाभा आहे. मन संवेदनशील असेल तर आपल्या जवळपास होत असलेल्या घटनांनी मन चलबिचल होत असेल? मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण लेखणी ची मदत घेतो. मनामध्ये जेव्हा घुसमट होत असते त्याच उद्रेकाने ते शब्द आपोआप पानावर उतरतात.
कविता, काव्य, भावना हे सगळं मनाशीच जोडलेलं आहे असं मला वाटतं. कारण बघा ना मनाला जर काही दुखले - खुपले की बोलून दाखवतो नाहीतर लेखनाचा मार्ग धरतो. अशी कमीच माणसं असतात जी लेखणीचा उपयोग करतात आणि काहीच लोकांना काव्यात्मक पद्धतीने बोलता, लिहिता येते.
मित्रांनो आपण कवितेचे प्रकार व रचना कशी करावी, यमक कसा जुळवायचा हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन. पण हा ब्लॉग कसा वाटला वाचून मला नक्की सांगा.
धन्यवाद