लोग सच कहते हैं - औरतें बेहद अजीब होतीं है.... बडी सुंदर कविता लिखी है गुलजार साहब ने.


Very beautifully written by Gulzar, the man who dedicates his books to 'Rakhi-the longest short story of my life' with grace

लोग सच कहते हैं - 
औरतें बेहद अजीब होतीं है

रात भर पूरा सोती नहीं
थोड़ा थोड़ा जागती रहतीं है
नींद की स्याही में 
उंगलियां डुबो कर
दिन की बही लिखतीं
टटोलती रहतीं है
दरवाजों की कुंडियाॅ
बच्चों की चादर 
पति का मन..
और जब जागती हैं सुबह 
तो पूरा नहीं जागती
नींद में ही भागतीं है

सच है, औरतें बेहद अजीब होतीं हैं

हवा की तरह घूमतीं, कभी घर में, कभी बाहर...
टिफिन में रोज़ नयी रखतीं कविताएँ
गमलों में रोज बो देती आशाऐं

पुराने अजीब से गाने गुनगुनातीं
और चल देतीं फिर
एक नये दिन के मुकाबिल
पहन कर फिर वही सीमायें 
खुद से दूर हो कर भी
सब के करीब होतीं हैं 

औरतें सच में, बेहद अजीब होतीं हैं

कभी कोई ख्वाब पूरा नहीं देखतीं
बीच में ही छोड़ कर देखने लगतीं हैं
चुल्हे पे चढ़ा दूध...

कभी कोई काम पूरा नहीं करतीं 
बीच में ही छोड़ कर ढूँढने लगतीं हैं 
बच्चों के मोजे, पेन्सिल, किताब 
बचपन में खोई गुडिया,
जवानी में खोए पलाश,

मायके में छूट गयी स्टापू की गोटी,
छिपन-छिपाई के ठिकाने 
वो छोटी बहन छिप के कहीं रोती... 

सहेलियों से लिए-दिये..
या चुकाए गए हिसाब 
बच्चों के मोजे, पेन्सिल किताब 

खोलती बंद करती खिड़कियाँ 
क्या कर रही हो?
सो गयी क्या ?
खाती रहती झिङकियाँ

न शौक से जीती है ,
न ठीक से मरती है
कोई काम ढ़ंग से नहीं करती है

सच है, औरतें बेहद अजीब होतीं हैं ।

कितनी बार देखी है...
मेकअप लगाये,
चेहरे के नील छिपाए
वो कांस्टेबल लडकी,
वो ब्यूटीशियन, 
वो भाभी, वो दीदी...
 
चप्पल के टूटे स्ट्रैप को
साड़ी के फाल से छिपाती
वो अनुशासन प्रिय टीचर 
और कभी दिख ही जाती है
कॉरीडोर में, जल्दी जल्दी चलती,
नाखूनों से सूखा आटा झाडते,

सुबह जल्दी में नहाई
अस्पताल मे आई वो लेडी डॉक्टर
दिन अक्सर गुजरता है शहादत में
रात फिर से सलीब होती है...

सच है, औरतें बेहद अजीब होतीं हैं

सूखे मौसम में बारिशों को
याद कर के रोतीं हैं 
उम्र भर हथेलियों में 
तितलियां संजोतीं हैं 

और जब एक दिन
बूंदें सचमुच बरस जातीं हैं
हवाएँ सचमुच गुनगुनाती हैं 
फिजाएं सचमुच खिलखिलातीं हैं 

तो ये सूखे कपड़ों, अचार, पापड़ 
बच्चों और सारी दुनिया को 
भीगने से बचाने को दौड़ जातीं हैं...

सच है, औरतें बेहद अजीब होतीं हैं ।

खुशी के एक आश्वासन पर
पूरा पूरा जीवन काट देतीं है
अनगिनत खाईयों को
अनगिनत पुलो से पाट देतीं है.

सच है, औरतें बेहद अजीब होतीं हैं ।

ऐसा कोई करता है क्या?
रस्मों के पहाड़ों, जंगलों में 
नदी की तरह बहती...
कोंपल की तरह फूटती...

जिन्दगी की आँख से
दिन रात इस तरह
और कोई झरता है क्या?
ऐसा कोई करता है क्या?

सच मे, औरतें बेहद अजीब होतीं हैं..

(हमारे जीवन में ख़ुशी, समर्पण और प्रेम बरसाने वाली हर महिला को सादर समर्पित)
🌺🌺🌺🌺🌺🌺

 Beautifully written by GULZAR...!

बापमाणुस

बापमाणुस

          माझा जन्म  1959  साली कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. आई चे नाव भागीरथी व बाबाचे नाव यलाप्पा अशी पुण्य माणसं आईवडील म्हणून मला लाभले. एक भाऊ आणि एक बहीण दोघेही माझ्याहून लहान होते. बाबा शेती करायचे आणि आई घर सांभाळायची.ती रोज चार ला उठून घरातील जात्यावर पीठ दळून भाकरी करायची. 1 किलोमीटर अंतर गाठून पाणी भरायची इतकं कष्ट कोणी केले नसतील तेवढं तिने कष्ट केलेत. माझं एक स्वप्न होतं की माझ्या आई बाबांना खुप सुख सुविधा द्याव्यात, आनंद द्यावा असं बरंच काही ठरवलं होतं. शाळेला जाऊ लागलो, मन लावून अभ्यास करू लागलो, कसं बस सहावी पर्यंत शिकलो शिकत असताना काम सुद्धा करायचो, पण खुप कठीण परिस्थिती माझ्या पुढे  निर्माण झाली आणि मी शाळा सोडून दिली. मी ज्या मालकांकडे कामाला जात होतो ते खुप सांगत होते की फक्त सातवी पूर्ण कर म्हणजे एखाद्या नोकरीत  तुला चिकटवू. पण परिस्थिती पुढे कुणाचच काही चालत नाही, सतत आई आजारी पडू (दमा) लागली बाबा काय करणार एकटे हे सगळे विचार, सर्वांची काळजी अस बरच काही म्हणून मी खुप खुप कष्ट करू लागलो, सकाळी लवकरउठून डबा स्वतःच करायचा आणि पायी जायचो, काट्या कुट्यातून, काटे बोचून घेत जायचो , तेव्हा धड पायात व्हना (चप्पल) नसायच्या तसाच चालत जायचो. अशीच कित्येक वर्षे गेली. 
                             
             बहीण मोठी  झाली होती तिच्या लग्नाची जबाबदारी मलाच पार पाडायची होती. आई नसताना कसं आणि काय करायचं हे सगळं पेलेल का? काही वर्षांनी तिचे लग्न जमलं. मुलगा समजूतदार होता. जमेल तशी तयारी केली आणि लग्न लावून दिल. तेव्हाची परिस्थिती खुप हलाखीची होती. त्यात सुद्धा काही कमी पडू दिलं नाही तिला. तिचा संसार सुखाचा चालू होता. दोन मुले आणि दोन सुंदर मुली झाल्या. तिच्या सुखात सुख मानून पुढे गेलो.

            पुढे काही वर्षांनी म्हणजेच 1978 साली माझं लग्न झालं. लक्ष्मी( तिचे नाव )च्या रूपाने लक्ष्मीच घरात आली,सोबत चांगली भेटली वाटलं की थोडं जीवन सुखी होईल पण ते नशिबात नव्हतं, काहीच महिन्यात आईचे निधन झाले. सर्वकाही निरर्थक झालं , वाटलं होतं तिला थोडं का होईना सुख, आनंद द्यावा, बायको आली म्हणजे थोडी कामातून सुटका होईल तिची, पण  देवाची वेगळीच इच्छा होती. सगळं कसं संपल्यासारखं झालं. सतत दुःख मनात राहून गेलं की माझ्या आईला सुख देऊ शकलो नाही, तिचे कष्ट कमी करावेत म्हटलं खरे पण देवाने त्या आधीच तिला या जगातून मोकळं केलं...........

                  हळू हळू दिवस पुढे ढकलत गेले, आणि काही दिवसांनी मी कामा निमित्ताने बाहेर गावी गेलो खुप खुप कष्ट केले कष्टाचं चीज करावं म्हणून घर बांधायला घेतलं आणि छोट का असेना घर बांधलं , त्याच वर्षी म्हणजे  1980 साली एका चिमुकल्याची चाहूल लागली माझ्या मोठ्या मुलाचा जन्म झाला आणि आमच्या दोघांच्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटलं. मुलगा दीड वर्षाचा झाला,आणि दुसरा मुलगा जन्मला तसे माझे कष्ट करणे वाढतच होते न मुलांकडे पाहिले ना बायको कडे सतत काम काम करू लागलो. सर्व सुख माझ्या मुलांना मिळावं हेच माझे स्वप्न होते. बाहेरगावी असताना थोडे सुख लागले न लागले तोच बाबांचे 1983 साली निधन झाले. ताबडतोबमी गावी आलो , आभाळ कोसळल्या सारखे झाले कारणजे बाप नावाचं छत्र जे होतं ते हरपणे म्हणजे काय हे शब्दात वर्णन करणे कठीण आहे.

             बाबा गेले, काही दिवसातच बहिणीला सुद्धा दम्याचा त्रास सुरू झाला आणि त्यातच लहान मुलांना टाकून, आम्हाला सर्वांना सोडून माझी बहिण देवाघरी गेली एका मागून एक दुःखाचे डोंगर कोसळत होते. त्या मुलांची जबाबदारी सुद्धा मीच घ्यायचे ठरवले. स्वतःचा आनंद न बघता, सगळं सोडून या सर्वांसाठी कष्ट करू लागलो. एकट्याने शक्य कधीच झालं नसतं हे, सोबत लक्ष्मी होती म्हणून घरात लक्ष्मी नांदत होती. काही कमी पडले नाही. त्यात मोठी भर पडली ती म्हणजे बऱ्याच वर्षांनी आणि दोन मुलांनंतर मुलगी झाली.  या सर्व दुःखांवर फुंकर घालण्यास का कोणास ठाऊक तिचा जन्म झाला असावा घरात आनंद नांदू लागला. बघता बघता मुले मोठी होऊ लागली.

            मुलांचे शिक्षण सर्वकाही लक्ष्मीच बघायची तशी मुलं माझी हुशार आणि शांत होतीच त्यामुळे माझे कामात लक्ष लागत होते. शिक्षण झाले, चांगली पदवी ग्रहण करून, चांगली नोकरी प्राप्त करून सेटल आहे सर्व काही,मुलीचे लग्न एक चांगल्या घरात झाले तीही सुखी आहे, मुलांची साथ मिळाली म्हणूनच हे सुखी दिवस बघू शकलो.  मुलांची लग्न झाली नातवंड आली घराचं गोकुळ झालं आणि याच कारण म्हणजे आई बाबांची पुण्याईच म्हणावी लागेल. जे इतक्या दुखानंतर , इतक्या परिश्रम नंतर मला लाभले आहे ते अवर्णनीय आहे......

            


कवितेवर बोलू काही भाग 2

 कवितेवर बोलू काही भाग 2

            नमस्कार मंडळी मागील भागामध्ये मी तुम्हाला कविता कशी होते ते सांगितले  किंवा कविता कशी लिहिली जाते ते सांगितले. पण आज आपण पाहणार आहोत कवितेचे प्रकार कोणते मुख्य म्हणजे सर्वात जास्त आणि अलगद या प्रकारच्या कविता होतात उदाहरणार्थ:-चारोळी, अभंग, मुक्तछंद, कविता रचणे, बालकविता, गझल, अशा कितीतरी प्रकारात ही कविता मोडली जाते. प्रत्येक प्रकाराची एक वेगळी शैली आहे, एक वेगळेच महत्त्व आहे.

          चारोळी काव्य प्रकार :- हा प्रकार सरळ आणि साधा फक्त चार ओळींमध्ये बसणारा प्रकार म्हणून याला चारोळी म्हणतात. या मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक येते.

वाऱ्यालाही भेदून
करून जाईल पार
जरी वादळ आले तरी
मानणार नाही हार

ही छोटीशी पण परिवर्तनात्मक चारोळी तुम्हाला समजण्यास मदत करेल.

‌    अभंग :- हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक  वृत्त-छंदहीआहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी या वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. , संत तुकाराम महाराज,संत नामदेव महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज इत्यादी संत होऊन गेले.
‌     चला तर मग ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचा आस्वाद घेऊ.......

पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥ १ ॥

वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥ २ ॥

पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥ ३ ॥

बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥ ४ ॥

अभंगांचे दोन प्रकार म्हणजे एक चार चरणांचा  आणि दोन चरणांचा आहे. चार चरणांचा अभंगाचे पहिल्या तीन चरणामध्ये सहा- सहा अक्षर असून शेवटच्या चरणात चार अक्षर असतात.  

उदा:-   हा  खालील सोपा अभंग पाहिल्यास तुम्हाला समजेल....

आषाढी कार्तिकी। पंढरीची ओढ।
मुखी नाम गोड। पांढुरंग।
चालती पाऊले। पंढरीची वाट।
वारीचा तो थाट।काय वर्णू।

       दोन चरणांचा अभंगाचा प्रत्येक चरण मध्ये आठ- आठ अक्षर राहतात आणि शेवटी यमक येतो.

जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।।


             मुक्तछंद कविता : - या कवितेच्या प्रकारात कविता सहज आणि अलगद दोरा उसवत जावा तशी कविता पानावर उतरते. यमक जुळतोय का नाही यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही . या कविता प्रकाराप्रमाणे मुक्त असतात, स्वच्छंद असतात. याला कशाची चौकट नसते पण आशय असला पाहिजे. म्हणून या प्रकाराला मुक्तछंद असे म्हणतात.
या प्रकारातील एक कविता उदाहरण म्हणून तुम्हाला दाखविते म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल.
  
तू गेलीस तरी
आठवतेस तू
प्रत्येक क्षणात
साठतेस तू
आठवणींच्या सागरात
दाटतेस तू
ओढ्यावर,
गच्चीतील गप्पांवर
साक्ष असलेल्या कट्ट्यांवर
गुपितं सांगणाऱ्या
त्या वृंदावणावर
आठवतेस तू
बोलत गेलेल्या त्या वाटांवर
घेऊन गेलेल्या त्या शेतांवर
नेऊन सोडलेल्या त्या काठांवर
आठवतेस तू.....
आठवतेस तू.....

बालकविता :- बाल कविता या लहान मुलांच्या वर लिहील्या जातात.  त्यांना आकर्षून घेण्यासाठी कवितेचा उपयोग होतो . काही नवीन शिकण्यासाठी मदत होते. कुठलाही विषय किंवा कोणतीही गोष्ट त्यांना सांगण्यास या कवितांची मदत होते आणि मुले उत्साहाने शिकतात.

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे....

किती छान आहे ही कविता मन अगदी उडून बालपणातच गेले. ही कविता बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची आहे. यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत.

गझल :- गझल प्रकार हा जरा अवघड प्रकार आहे . गझल हा वृत्तप्रकार व काव्याचा तसेच गायनाचा प्रकार आहे. इस्लामी संस्कृती कडून गझल प्रकार कळला, तेराव्या शतकातील सुफी संत तुघलक साम्राज्याचा राजकवी अमीर खुसरो यांच्यामुळे हा गझल प्रकार नावारूपाला आला.
        गझले मध्ये साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा शेर असते. शेरामधील ओळींना मिसरा म्हणतात. तुम्हाला उदाहरण म्हणून माझी आवडती सुरेश भटांची गझलेचा नजराणा खास माझ्या काव्य प्रिय मित्र मैत्रिणीसाठी....

हे तुझे अशा वेळी लाजने बरे नाही

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही

ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही

व्वा किती अप्रतिम आणि किती वेगळी रोमँटिक गझल आहे आदरणीय सुरेश भटांची ही गझल.

हे झाले कवितेचे काही प्रकार मी तुम्हाला सांगितले. आशा करते की माझी माहिती आपल्याला उपयुक्त ठरावी. अशे अजून खूप प्रकार या काव्यसागरात आहेत पण ते पुढे कधी तरी पाहूच. पुढे सुद्धा असेच ब्लॉग वेगवेगळ्या विषयांवर तुमच्यासाठी खास घेऊन येत राहीन. तत्पूर्वी ब्लॉग आवडल्यास comment, share नक्की करा.

कवितेवर बोलू काही

         कवितेवर बोलू काही....

           माझा हा पहिलाच ब्लॉग कवितेवर आहे. सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो, की कसं काय जमतं या कवी मंडळींना कविता करायला? कसं सुचतं इतकं लिहायला? वगैरे वगैरे..... 

           मित्रांनो कविता शिकणे सुध्दा ही एक कला आहे. आणि मन हा तिचा गाभा आहे.  मन संवेदनशील असेल तर  आपल्या जवळपास होत असलेल्या घटनांनी मन चलबिचल होत असेल? मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण लेखणी ची मदत घेतो. मनामध्ये जेव्हा घुसमट होत असते त्याच उद्रेकाने ते शब्द आपोआप पानावर उतरतात.

          कविता, काव्य, भावना हे सगळं मनाशीच जोडलेलं आहे असं मला वाटतं. कारण बघा ना मनाला जर काही दुखले - खुपले की बोलून दाखवतो नाहीतर लेखनाचा मार्ग धरतो. अशी कमीच माणसं असतात जी लेखणीचा उपयोग करतात आणि काहीच लोकांना काव्यात्मक पद्धतीने बोलता, लिहिता येते. 

        मित्रांनो आपण कवितेचे प्रकार व रचना कशी करावी, यमक कसा जुळवायचा हे  मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन. पण हा ब्लॉग कसा वाटला वाचून मला नक्की सांगा.

धन्यवाद

लोग सच कहते हैं - औरतें बेहद अजीब होतीं है.... बडी सुंदर कविता लिखी है गुलजार साहब ने.

Very beautifully written by Gulzar, the man who dedicates his books to 'Rakhi-the longest short story of my life' with g...